कविता, चारोळ्या, तू आणि मी

रंग

किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मीतुला दाखवू आज नेमका कोणता मी रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबीकी दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…

कविता, चारोळ्या, तू आणि मी

वारा

विसरू पहातेस मला लाख यत्ने परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा पार्थिव अस्तित्व नाहीच माझें सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?

कविता, चारोळ्या, तू आणि मी

शून्य

कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावेमाझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावेतरी माझ्या नसण्याने तिचे […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

तुझे प्रश्न

तुझेही तेच प्रश्न अगदी माझ्याच सारखेत्यांचे तेच उत्तर अगदी माझ्याच सारखे दिलासा एवढाच आपल्या ह्या साधर्म्याचाचुकते तुझेही उत्तर अगदी माझ्याच सारखे!

चारोळ्या, तू आणि मी

सोबती

कधीतरी होतो मी ही तुझ्यासोबत…झाली चुकामूक आड-वळणावर… ना मला दुःख त्याचे तसे तुलाही ते नसावे…वाटेतल्या सोबतीचे बहुधा हेच भाग्य असावे…

चारोळ्या, सहजच

वाटतो जरी मी…

वाटतो जरी मी असा मस्त आहेतरी आतून नेहमीच अस्वस्थ आहे… म्हणतो उफाळून जगावे पुन्हा येथेजिथे मरणे त्याहून खूप स्वस्त आहे…