आवडू लागले आहे
टाळणे तुझे मला
पाहतांना वळून मागे
गाळणे तुझे मला
उगाच पडून होतो
जणू मी पुस्तक कोरे
सुरू झाले आज कसे ते
चाळणे तुझे मला
घनदाट ह्या शहरांतला
हिंस्त्र मी होतो पशू
न जाणो घडले कसे
पाळणे तुझे मला (?)
प्रेमात वेडा ठार
मी हिंडतो दारो-दार
वाटते उबदार का हे
जाळणे तुझे मला (?)
बोलतांना नांव माझे
रोज तुझ्या ओठांवरी
वेडावते लाडिक हे
छळणे तुझे मला