नाही दुःख जगण्याचे अन् आनंद मरण्याचा
तुजवीण नकोसा हा सोहळा असण्याचा!!
ना दिसतो कुणा मी मिट्ट काळोखात व्यथेच्या
तेवढाच काय तो नफा मला सावळा असण्याचा
झिडकारले जगाने उपदेश माझे फुकाचे
नसतो दोष नेहमीच वेष बावळा असण्याचा
तुटतच नव्हती ही मजबूत फांदी नात्याची
अचानक आला मग क्षण कावळा बसण्याचा
पाहता आरशातही दिसते तुझेच प्रतिबिंब
करतो प्रयत्न मी ही रोज वेगळा दिसण्याचा
:-प्रसन्न राऊत