मी मनात येईल तेव्हा
तिला काहीबाही बोलतो
कारण एक तिच्याशिवाय
इथे माझे कोण ऐकतो
आहे ती माझीच म्हणून
तिच्यावर हक्क गाजवतो
एक तिच्याशिवाय माझं
आहेच कोण म्हणतो
वाईट वाटते तिला
तेव्हा मीही दुखावतो
कारण मीही तिच्यावर
खूप प्रेम करतो…
न पूर्ण होण्यासारखे
करतो हट्ट तिच्याकडे
माझीच राहशील ना
म्हणून घालतो साकडे
तीही लाजून हसते पण
उत्तर काही देत नाही
तुझ्या होकाराविना
माझं काही खरं नाही
तुझ्या एक होकारासाठी
मी दिन रात झुरतो
कारण मी तुझ्यावर
खूप प्रेम करतो…