वाटते झाली आहे सवय दुःखाची
करेल का कोणी जरा सोय दुःखाची
आहे उरलेली, अर्धी भरलेली ती
चालेल मला बाटली प्रिय दुःखाची
दूर हो इथून सांगते आता मला
वाढली इतकी बिशाद काय दुःखाची?
माजलास तू ह्या सुखाच्याच दुधावर
चाखली आहेस कधी साय दुःखाची?
कल्पनेनेच सुखाच्या शहारा येतो
घेते उबदार कुशीत माय दुःखाची
शाप देवोत उग्र ते कितीही कोणी
तेवढी न लागो अशी हाय दुःखाची!