होतोच कधी आम्ही खास तसे घराचे (?)
व्यर्थ म्हणती लोक फिरले वासे घराचे
साद दिली नाहीच कधी दूर जाताना
कानी पडले कोरडे उसासे घराचे
झाले किती तरी आपण एकमेकांचे
नकोत असे ते खोटे दिलासे घराचे
डाव रंगले कित्येक त्या क्रूर खेळाचे
चुकीचे पडले आताही फासे घराचे
क्षण आनंदाचे नाहीच मिळाले कधी
असावेत रिकामेच तुझ्या खिसे घराचे
माझे माझे सर्व म्हणतच जन्म गेला
तुमच्या हट्टानेच झाले हसे घराचे
आहे अजून गर्दी माणसांची तुमच्या
न जाणो मलाच ना कोणी दिसे घराचे
पटले नाहीच कधी तुला माझे काही
का विचारतेस व्हायचे कसे घराचे(?)