कसेही कुठेही वळतात रस्ते
पुन्हा माघारीच नेतात रस्ते
उभा चौकात मी स्तब्ध आहे
वेगात कुठे हे पळतात रस्ते (?)
काय साधले तुझ्या आंदोलनांनी (?)
की व्यर्थ उगाच हे जळतात रस्ते
कुठले ध्येय आजवर तू गाठले (?)
पुन्हा विचारून छळतात रस्ते
जायचे दोन बाजूंस तुला नी मला
तरी आपले इथे जुळतात रस्ते
भाऊच ते दोघे, एकाच आईचे
तरी एकमेकांचे टाळतात रस्ते