तू भेटलास तेव्हा तुला नीट
बघायाचे राहून गेले
मनात होते बरेच काही
पण सांगायाचे राहून गेले
कळलेच नाही माझे मला
मी वेळ कोठे सांडला
क्षणांतच मग बरेच काही
करायाचे राहून गेले
किती आतुर होते मी
तुझ्या पहिल्या भेटीसाठी
धुंदीतच त्या तुझ्यासाठी
नटायचे राहून गेले
न मिळती उत्तरे आजवर
तुझ्या त्या गहन प्रश्नांची
तू समोर असतांना तुला
ती विचारायचे राहून गेले
दूर होतो असे आपण
तरी डाव प्रेमाचा रंगला
भेटीच्या त्या क्षणांत मात्र
ते खेळायाचे राहून गेले
जवळ घेईन म्हटले तुला
पहिल्याच भेटीत होईन तुझी
तू हात हाती दिलास मात्र
तुझ्या मिठीत यायचे राहून गेले
मी प्रयत्न केला जीव तोडून
बोलायचा खास काही
पण हिच आपली भेट शेवटची
हे बोलायाचे राहून गेले