…माणसाच्या आयुष्यात तो न्यूट्रल पॉईंट लवकरच यायला हवा.
..हो न्यूट्रल पॉईंट, म्हणजे बाहेरून ओढ लावणारे प्रेम, हवेहवेसेपण आणि आतल्या आत कोलमडून टाकणारं दुःख, एकटेपण कसं समसमान असायला हवं जेणेकरून बाहेरच्या ओढीने फुटूनही जाता येणार नाही आणि आतल्या आत कोलमडूनही…बाहेरचा दबाव कसा आतल्या रागाला दाबून ठेवत असला पाहिजे…एकदा का हा न्यूट्रल पॉईंट गाठला की माणसाची मनमानी कमी होते, आयुष्य balanced वाटायला लागतं आणि पुढची वाटचालही सोपी होते…माणूस बनण्याची!!