पहाटे पहाटे आलीस स्वप्नी तू
परी भेट माझी आणली नाहीस तू
तुझ्या येण्याने दिवस सुरू व्हावा
अहो भाग्य माझे, दिसलीस तू, हसलीस तू….
दिसतेस तू की भासतेस तू
ना जाणो असे काय करतेस तू
मी शोधतो तुला सर्वत्र पण
लपलेली कुठे असतेस तू…
बघ आला हा पुन्हा पावसाळा
घेऊन चिंब भावनांचा ओलावा
आता तरी भिजूदे स्वतःला
का दुःखात त्या जळतेस तू
लपलेली कुठे असतेस तू…
मी नाही कवी तरी
किती एक कविता केल्या तुजवरी
तरी अजूनही कोरीच तू कोरीच तू…