कितीही कर्तृत्ववान माणूस झाला आणि एखाद्या क्षणी त्याने स्वतः बद्दलची जबाबदारी मग ती कोणत्याही प्रकारची का असेना, घेण्याचे टाळले की मग त्या गोष्टीची जबाबदारी डोक्यावर घ्यायला ‘आपले’ म्हणवणारे कितीतरी लोक अचानक तयार होतात आणि मग सुरू होतो त्या माणसाच्या कर्तृत्व ह्रासाचा प्रवास…त्या वेळी अनाहूतपणे नाकारलेल्या त्या जबाबदरीला इतरांनी स्वीकारून, त्यांना कोणतीही कल्पना नसताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा स्वीकार करून, ते योग्य मानून आपली अक्कल गहाण ठेवली की मग सगळे जग अशा माणसाला चुकीचे, आपल्या विरुद्ध असल्याचे वाटू लागते अशा वेळेस पूर्वी आपल्याला आधार देणारे आपल्यासाठी त्याग करणारे वगैरे सगळे अचानक तुच्छ आणि स्वार्थी वाटू लागतात आणि मग वेग घेतो तो एका कर्तृत्ववान, यशस्वी माणसाचा अपयशाच्या दिशेने एकतर्फी प्रवास…कदाचित आर्थिक त्रास पूर्व पुण्याईने आणि आधी गाजवलेल्या कर्तृत्वामुळे होणार नाही किंवा कमी होईल पण मानसिक त्रास आणि पुढे येणारे अपयश काही चुकायचे नाही…काहीही झाले तरी माणसाने स्वतःबद्दलच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या शिरावर घेऊन निर्णय घेणे आणि त्यानुसार वागणे केव्हाही श्रेयस्कर…