तू मनात येईल तेव्हा तिला
वाट्टेल ते बोलतोस
तुझ्या बोलण्याने तिला
खोलवर दुखावतोस
एवढं सगळं असून सुद्धा
ती पुन्हा तुझ्याशी बोलते
तुझे अपराध पोटात घेऊन
ती तुला समजावते
तुझ्या पुरुषी अहंकाराला
ती हळुवार गोंजारते
कारण ती तुझ्यावर
खूप प्रेम करते!!
तुला जमले करायला
तुझ्या प्रेमाचे भांडवल
तुझ्या वेड्या अपेक्षांचे
तीने सोसले हलाहल
व्यवहारी जगात तुझी
ती अव्यवहारी वचने
तीने तीही पूर्ण केली
न करता काही खळखळ
अशा माणसाला वेड्या
ती छातीशी कवटाळते
कारण ती तुझ्यावर
खूप प्रेम करते!!
सांगत नाही कधी ती तुला
आवडतोस तू किती तिला
तुझी साथ असणे
हेच जगणे वाटते तिला
सोबत तुझी हवीहवीशी
नाही कायमची मिळणार तिला
कठोर वास्तवाचे चटके
सहन करत राहते
नाव नसलेल्या नात्यालाही
ती सर्वस्वी निभावत राहते
कारण ती तुझ्यावर
खूप प्रेम करते!!