होत असंही कधीतरी
सांगायचं खूप काही असंत
पण शब्दच सापडत नाहीत….
होत असंही कधीतरी
बोलायचं खूप काही असंत
पण हिम्मतच होत नाही….
होत असंही कधीतरी
माणूस आपलंच असतं
पण आपलेपणा वाटत नाही….
होत असंही कधीतरी
घडतं खूप काही
पण आपण त्यात नसतो….
होतं असंही कधीतरी
की जीव आपला गुंततो
आणि फसल्यासारखही वाटतं….
होतं असही कधीतरी
की तो नजरेनेच खुणावतो
आणि आपण बेभान होतो….
होतं असही कधीतरी
की तो प्रेम करतो
आणि आपण सर्वस्व हरतो….
होतं असही कधीतरी
की तो मिळणार नसतो
पण तरीही माझाच असतो….
होतं असही कधीतरी
की तो तसाच निघून जातो
आणि आपण आपलेच नुरतो….