सर्वस्व हरवून विसरून जाणं
हीच तर आपली ‘ style ‘ आहे
तुझ्या नसण्याचं दुःख सुद्धा
अगदीच ‘ short while ‘ आहे
होतच नाही ‘ delete ‘ डोक्यातून
ही कसली तुझी ‘ file ‘ आहे
रोग जडलाय ‘ unknown ‘ मला (?)
की ‘ virus ‘ तुझं ‘ smile ‘ आहे (?)
नको ना अशी नजर रोखून बघूस
मन माझे भलतेच ‘ fragile ‘ आहे
कुठे तू अन् कुठे मी
कसली ‘ hi -fi ‘ तुझी ‘ profile ‘ आहे
‘ programming – testing ‘ स्वतःच करते
प्रेमात पण का तू ‘ agile ‘ आहे (?)
थांब जरा घाई नको इतकी कसलीच
आपला सगळाच मामला ‘ volatile ‘ आहे