कधी शोधतो आहे कोणता खरा मी
कधी वाटते आहे एकटा बरा मी
जरी दिसतो असा राकट विचित्र
आतून आहे तसा हळवा जरा मी
घेऊन फिरतो चेहऱ्यावर ते हास्य
आतून दुःखाचा वाहता झरा मी
माझ्या अशा धुंदीचे मी काय करावे?
माझ्या नशेवर जालीम उतारा मी
विचारतेस विखरलिस किती गावे
नाहीच गं, इतका वादळी वारा मी
सांगायचे नव्हते तसे तुला काही
उगीच केला तरी तुला इशारा मी
कुठे शोधू ते तुझे नवीन खेळणे
अस्ताव्यस्त पसरला हा पसारा मी
(सांभाळलेस तू स्वतःचे स्वतःला)
तू स्वतःच उभी होतीस खंबीर
व्यर्थ वाटले तुला तुझा सहारा मी