कविता, तू आणि मीपाऊस मी पाऊस उनाड वेडाअसाच अचानक येतोमनात नसतानाही नकळत चिंब करतो धरू पाहता मुठीत घट्टमी सहजच निसटून जातोमातीत मिसळून मग मीसुगंध अल्लड होतो कर ओंजळ तू जीवाची मी थेंबानी भरून देईनजमवून मला बघ अलगदतर तुझाच होऊनि राहीन